जलपुनर्भरण कार्यक्रम पुर्णत्व समारंभ

Friday June 10, 2016


04:30PM – 05:00PM

कार्यक्रम माहिती

अध्यक्ष :

डॉ. एन. एस. झुल्पे
प्राचार्य, कॉक्सिट, लातूर
उद्घाटक :

मा. अॅड. दिपक सुळ
महापौर, महानगरपालिका, लातूर.

लातूर येथील संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालयातील (कॉक्सिट) विंधन विहीरीचे जलपुनर्भरण पुर्णत्वाचा समारंभ घेण्यात आला. या समारंभाचे उदघाटन लातूर शहराचे महापौर दीपक सुळ यांच्या हस्ते करण्यात आले.

नैसर्गीक पाण्याची भुजल पातळी वाढावी व पाऊसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी कॉक्सिट कॅम्पसमधील विंधन विहीरीचे (बोअर) पुर्नभरण (रेन हार्व्हेस्टींग) करण्यात आले. इमारतीच्या छतावर पडणारे पाणी पुनर्भरणामुळे वापरणे शक्य होणार आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एम.आर.पाटील, प्राचार्य डॉ.एन.एस.झुल्पे, उपप्राचार्य डॉ.बी.एल.गायकवाड, प्रा.एस.आर.माने, प्रा.एन.व्ही.मोरे, प्रा.डी.आर.सोमवंशी तसेच इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.