गुणगौरव सत्कार सोहळा

गुरुवार जुलै १२, २०१८


04:00PM – 06:00PM

कार्यक्रम माहिती

प्रमुख पाहुणे :

मा. डॉ. पंडीत विद्यासागर
(कुलगुरू, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड)
अध्यक्ष :

डॉ. एम. आर. पाटील
(अध्यक्ष, रॉयल एज्युकेशन सोायटी, लातूर)
प्राचार्य :

डॉ. एन. एस. झुल्पे
(प्राचार्य, कॉक्सिट, लातूर)
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर :
प्रा. के. एस. जेवे
(कॉक्सिट, लातूर)

संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय (कॉक्सिट) मध्ये स्वा.रा.ती. मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. पंडीत विद्यासागर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांचा गुणगौरव व सत्कार संपन्न झाला. या गुणगौरव व सत्कार सोहळ्यामध्ये विप्रो, टी.सी.एस.व इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झालेले विद्यार्थी, एन.पी.टी.ई.एल. व इतर ऑनलाईन कोर्सेसमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व प्राध्यापक, आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये पी.एच.डी. साठी निवड झालेली व झी 24 तास या वृत्तवाहिनीकडून यंग इनोव्हेटर अवॉर्ड मिळविलेला विद्यार्थी, अशा सर्वांचा गौरव करण्यात आला.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये बोलताना कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांनी 21 व्या शतकामध्ये आव्हाने पेलण्यासाठी आणि जागतिक स्पर्धेत अग्रेसर राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी सजग असणे, ज्ञानासोबत अनेेक कौशल्ये आत्मसात करणे व विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तीमत्व बहुआयामी करणे गरजेचे असल्याचे महत्व सांगितले. तसेच जागतिक बदलासाठी नेहमी परिवर्तनशील असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

या सत्कारामध्ये सर्वप्रथम विप्रो, टीसीएस व इतर नामांकित कंपण्यामध्ये निवड झालेल्या मुळीक संतोष, नरवडे दिपाली, खेडकर उमाकांत, मिसाळ ऋषिकेश, घोडके शुभम, देशमुख प्रियांका, देशमुख ध्रुव, मोरे प्रशांत, गांधी ईशा, शिंदे रजत, फुलसुंदर दिपक, वाघ शुभम, घोगे स्नेहा, शेख सना, बिरादार आकाश, मोरे रोहीत यांचा समावेश होतो. युडेमी, इडीएक्स इंटरनॅशनल सर्टिफिकेशन मिळविलेल्या विद्यार्थ्यामध्ये अन्सारी तरन्नुम, चॉंद शेख, राधिका कंदाकुर्तीकर, कुलकर्णी ईश्वरी, कदम शुभम, स्नेहा तगाले, श्रुती जाधव आणि एन.पी.टी.ई.एल. सर्टिफिकेशन मिळविलेले प्राध्यापक - प्राचार्य डॉ. एन.एस. झुल्पे, डॉ. एन. व्ही. मोरे, प्रा. के एस. गोमारे, प्रा. ए. ए. पवळे, प्रा. व्ही.व्ही. भोसले, प्रा. ए.एम. सौदागर, प्रा. एम ए.गायकवाड, प्रा. के. पी. माकणीकर , युडेमी इंटरनॅशनल सर्टिफिकेशन प्राप्त केलेले प्रा. शुभम हेंगणे, प्रा. जान्हवी रामदासी, प्रा. सत्यजीत सिरसाट तसेच थायलंड येथील प्रिन्स ऑफ सोंकला विद्यापीठात पीएच.डी. साठी निवड झालेली एम.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी मधील कु पुजा नागीमे, झी 24 तास या वृत्तवाहिनीकडून 2018 चा यंग इनोवेटर ऍवार्ड विजेता कु. योगेश श्रीगोपाल दायमा, आय आय टी रुरकी येथे झालेल्या नॅशनल लेवल क्वॉडकॉप्टर चॅम्पीयनशिप मध्ये तृतीय क्रमांक मिळविलेले प्रा. किशोर जेवे व प्रा. अमोल कुंभार या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना रॉयल एज्युकेशन सोसायटीचें अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी केंद्रीत शिक्षण प्रणालीचे महत्व सागितले आणि प्राध्यापकांनीही उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा गाठण्यासाठी प्रयत्नशिल असणे आवश्यक असल्याचे सांगीतले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन.एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. बी. एल. गायकवाड, डॉ.एन व्ही.मोरे, प्रा.आय.एम. काझी, प्रा.एस.एस.जेवे, ट्रेनींग ऍण्ड प्लेसमेंट सेल चे प्रमुख प्रा. किशोर जेवे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच यावेळी गौरवीत प्राध्यापक व विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किशोर जेवे तर सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. कैलास जाधव यांनी केले.