सतर्क पालकामुळे प्रोत्साहनात्मक वातावरणाची निर्मीती

Sunday July 04, 2016


11:00AM – 01:00PM

कार्यक्रम माहिती

प्रमुख पाहुणे:

डॉ. एन. एस. झुल्पे
प्राचार्य, कॉक्सिट, लातूर
अध्यक्ष:

डॉ. एम. आर. पाटील
अध्यक्ष, रॉयल एज्युकेशन सोसायटी, लातूर
पालक प्रतिनिधी:

1) मा. शहाजी पाटील
2) डॉ. कठारे
प्रास्ताविक:

प्रा. डी. आर. सोमवंशी
विभाग प्रमुख, कॉम्प्युटर अँप्लिकेशन, कॉक्सिट, लातूर
सुत्रसंचालन:

1) प्रा. सौ. डी. एच. महामुनी
2) प्रा. सौ. जे. आर. कावळे

लातूर येथील अंबाजोगाईरोडवरील संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालयात (कॉक्सिट) पालक मेळावा घेण्यात आला. यामध्ये बोलत असताना माजी प्राचार्य डॉ.एम.आर.पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत सतर्क असलेल्या पालकामुळे प्रोत्साहनात्मक शैक्षणीक वातावरणाची निर्मीती होते.

कॉक्सिटमध्ये सन २०१६-२०१७ या शैक्षणीक वर्षात बी.सी.ए., बी.एस्सी. एसई, बी.एस्सी.सीएस, बीएस्सीएनटी, या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन तथा माजी प्राचार्य डॉ.एम.आर.पाटील अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, मुले शिकावीत व स्वावलंबी व्हावीत ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. यासाठी कॉक्सिटमध्ये आयटी कंपन्यासाठी लागणारे कौशल्य विद्यार्थ्यामध्ये विकसीत करण्यासाठी चांगल्या सुविधा, ट्रेनींग प्लेसमेंटमध्ये उपक्रम घेण्यावर भर दिला जात आहे. परंतू पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत उदासीन न राहता वेळोवेळी माहिती घ्यावी व जागरूक रहावे. यामुळे प्रोत्साहनात्मक शैक्षणीक वातावरण तयार होते.

प्राचार्य डॉ.एन.एस.झुल्पे म्हणाले की, कॉक्सिटने विद्यार्थ्यांचे शैक्षणीक वार्षिक वेळापत्रक केले आहे. नियोजनानुसार तयारी करणारे सर्व विद्यार्थी नक्कीच २०१९ च्या कॅम्पस मुलाखतीत यशस्वी होतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. पालक प्रतिनिधी शहाजी पाटील यांनी कॉक्सिटचा आयटी शिक्षणात क्रमांक एक असून येथे पाल्याला शिक्षण देणे अभिमानास्पद वाटत असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डी.आर.सोमवंशी यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. सौ.डी.एच.महामुनी यांनी तर आभार प्रा.सौ.जे.आर.कावळे यांनी मानले. या पालकमेळाव्याला पालक प्रतिनिधी डॉ.कठारे, सर्व विभागप्रमुख, पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.